पंढरपूर सिंहगड- ‘बॉलपेनच्या सहाय्याने रेखाटलेल्या व्यक्तीचित्रांचे अभूतपुर्व असे भव्य प्रदर्शन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 29 February 2020

पंढरपूर सिंहगड- ‘बॉलपेनच्या सहाय्याने रेखाटलेल्या व्यक्तीचित्रांचे अभूतपुर्व असे भव्य प्रदर्शन


Pandharpur Live- 
पंढरपूर सिंहगड मध्ये जोतिराम काटकर यांनी पेनाने काढलेल्या स्केचचे प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात या प्रदर्शनाचे उदघाटन पंढरपूर मधील प्रसिद्ध कलाकार भारत गदगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर उपस्थित होते.

 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या रेखाचित्रं त्या प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आलेल्या नागरिकांनी ज्योतीराम काटकर यांनी काढलेल्या रेखा चित्रांचे फोटो व रेखाचिञासोबत सेल्फी काढून घेतले.

   यावेळी जोतिराम काटकर यांनी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा अनेक व्यक्तीचे रेखाचिञ पेनच्या साह्याने रेखाटली आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 1 हजार हून अधिक वेगवेगळ्या व्यक्तीचे स्केच नागरिकांना पाहण्यासाठी ठेवले होते.

पंढरपूर मधील प्रसिद्ध कलाकार भारत गदगे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची पाहणी करून ज्योतीराम काटकर यांनी यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कौतुक केले. यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना चित्रकार म्हणाले की, पेन्सिलने स्केच करणे सोपे असते कारण कुठे चुकले तर ते खोडून दुरुस्त करता येते; परंतु पेनने एखाद्याचे व्यक्तीचित्र रेखाटणे खुप कठीण कार्य असते. बॉलपेनद्वारे मी अनेक सर्वसामान्यांची, थोरा-मोठ्या व्यक्तीमत्वाची व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. या सर्व व्यक्तीचित्रांचे प्रदर्शन सिंहगड महाविद्यालयात भरवण्याची संधी प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिल्यामुळे आज पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना व नागरिकांसमोर ही कला सादर करता आली. असेही ते म्हणाले.
 हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. 

add