सोलापूर- निवृत्त अधिका-यानं मागितली 'भीक मांगो' आंदोलनाची परवानगी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Thursday, 13 February 2020

सोलापूर- निवृत्त अधिका-यानं मागितली 'भीक मांगो' आंदोलनाची परवानगी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मागील 3 वर्षे व 7 महिन्यांपासून आपल्या अर्जावर कोणतीच कारवाई झाली नाही. प्रत्येक वेळी त्रुटी काढून सेवानिवृत्ती लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचेही मेटकरी यांनी नमूद केले आहे. प्रशासनाने तातडीने सेवानिवृत्तीचा लाभ तरी मंजूर करावा किंवा भीक मांगो आंदोलन करण्यास परवानगी तरी द्यावी, अशी मागणी निवृत्त अधिकारी मेटकरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर केल्याने याप्रकरणी खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अशोक मेटकरी यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे भीक मांगो आंदोलन करण्यास परवानगी मागितली आहे. निवृत्तीनंतरचे मिळणारे लाभच मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

समाजकल्याण विभागात कार्यरत असताना खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, सेवा जिल्हा परिषदेकडे असताना चौकशीचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने समाजकल्याण आयुक्‍त कार्यालयाकडे पाठविण्यात आला. कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या चुकीच्या माहितीने सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ रोखून ठेवण्यात आल्याची तक्रार मेटकरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

Ad