पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरूंच्या कार्यप्रणाली बाबत प्रश्नचिन्ह? परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत व विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानीबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक! ....अन्यथा ‘कुलगुरू हटाव’ मोहिम हाती घेऊ-श्रीकांत शिंदे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 1 February 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरूंच्या कार्यप्रणाली बाबत प्रश्नचिन्ह? परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत व विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानीबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक! ....अन्यथा ‘कुलगुरू हटाव’ मोहिम हाती घेऊ-श्रीकांत शिंदे


Pandharpur Live - 
सर्व विषयांचे निकाल लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात जाहीर करावे व मगच युवा स्पंदन सारखे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे अन जर कुलगुरू फडणवीस मॅडम यांना हे अत्यंत जबाबदारी चे असणारे पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतः या पदावरून बाजूंला व्हावे अन्यथा पुढील काळात कुलगुरू हटाव अशी मोहीम राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्त्यांना हातात घेऊन  विद्यापीठाच्या आवारात आंदोलन सुरू करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ही गोरगरीब व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे या उद्देशाने झाली आहे.  सोलापूर विद्यापीठ हे एकमेव असे जिल्ह्यापुरते मर्यादित असणारे पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची तसेच दुष्काळग्रस्त भागातील जवळजवळ हेच ते दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

         विद्यापीठाला आत्तापर्यंत चार कुलगुरू लाभले आहेत. मात्र गेली एक ते दीड वर्षापासून विद्यापीठामध्ये विविध गैरप्रकार घडत असल्याचे तसेच परीक्षा विभागामध्ये देखील अनेक गैरप्रकार घडल्याने जिल्ह्यातील जनतेमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पाल्याला विद्यापीठांमध्ये प्रवेश द्यावा की नाही याचा विचार जिल्ह्यातील बळीराजा व सामान्य जनता करत आहे. कारण 80 दिवस होत आले तरी अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप पर्यंत लागलेले नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. अभियांत्रिकी, फार्मसी तसेच बीए सारखे निकाल अद्यापर्यंत न लागल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. अद्याप पर्यंत निकालच  लागलेले नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच पुनर मूल्यांकनाची कार्यवाही देखील उशीर होणार असल्याने त्यांना पुढील प्रवेश घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात.

    तसेच जे निकाल लागले तेदेखील साठ 70 व 75 दिवसांनी लागलेले आहेत त्यामुळे कुलगुरूंच्या कार्यप्रणाली बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

  त्यामुळे आपणास नम्र विनंती करतो की उर्वरीत सर्व विषयांचे निकाल लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात जाहीर करावे व मगच युवा स्पंदन सारखे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे अन जर कुलगुरू फडणवीस मॅडम यांना हे अत्यंत जबाबदारी चे असणारे पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतः या पदावरून बाजूंला व्हावे अन्यथा पुढील काळात कुलगुरू हटाव अशी मोहीम राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्त्यांना हातात घेऊन  विद्यापीठाच्या आवारात आंदोलन सुरू करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सचिव श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली आहे.

add