अबब! खोदकाम करताना तांब्याच्या भांड्यात मिळाली 505 सोन्याची नाणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 28 February 2020

अबब! खोदकाम करताना तांब्याच्या भांड्यात मिळाली 505 सोन्याची नाणी

Pandharpur Live Online-
भारतात पूर्वीच्या काळात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणत होते, त्याचबरोबर 'सोने कि चिडिया' हि असं भारताला म्हटलं जात होत. यालाही काही कारण होत, भारत हा पूर्वी आताच्या तुलनेत सुखी, समृद्धी आणि विकसित देश होता असं सांगण्यात येत. भारतातील अनेक ठिकाणी खोदकाम करताना याच वाक्याची प्रचिती देणाऱ्या गोष्टी सापल्याची काही उदाहरणेही आहेत.

तामिळनाडूमध्ये ही असच काही घडले आहे, तामिळनाडूतील थिरुवनाईकवल येथील जम्बुकेश्वर मंदिराच्या शेजारी खोदकाम करताना तांब्याच्या भांड्यात तब्बल १.७१६ किलोग्राम वजनाची सोन्याची नाणी सापडली आहेत. ५०५ सोन्याची नाणी मिळाल्याची खबर ही वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

ही नाणी तब्बल 1000 ते 1200 वर्ष जुनी आहेत. जमिनीच्या 7 फूट खाली एका तांब्याच्या भांड्यात ही नाणी सापडली आहेत. मंदिराच्या शेजारी मिळालेल्या या सोन्याच्या नाण्यांवर अरबी लिपीतील अक्षरं आहेत. अशी मंदिराच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली आहे.
Tamil Nadu: 505 gold coins weighing 1.716 kg found in a vessel during digging at Jambukeswarar Temple in Thiruvanaikaval, Tiruchirappalli district yesterday. Coins were later handed over to the police.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

1,812 people are talking about this
याबाबत मंदीर प्रशासनाकडून ही सोन्याची नाणी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. या सोन्याच्या नाण्यांच्या किमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र देशभर या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.

add