आंदोलन करूनही व्यवस्थेत आवश्यक ते बदल होत नाहीत- आण्णा हजारे यांची खंत - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 3 February 2020

आंदोलन करूनही व्यवस्थेत आवश्यक ते बदल होत नाहीत- आण्णा हजारे यांची खंत


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  आंदोलन करूनही व्यवस्थेत आवश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे आता वाटतंय की कायमचं मौन धारण करावं, अशा भावना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या आहेत.


निर्भया प्रकरणातील दोषींना लवकर फाशी देण्यात यावी या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं 20 डिसेंबरपासून मौन सुरू आहे. या प्रकरणासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयात रविवारी सुनावणी झाली.

आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीवर लावण्यात आलेली स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकार, तिहार कारागृहाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी तूर्त प्रलंबितच राहिली आहे.

दरम्यान, फाशी लांबत असल्याने अण्णा हजारे यांचं मौनही लांबत आहे. त्यामुळे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी गावातील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने, मौन मागे घ्यावं, अशी विनंती केली.


No comments:

Post a Comment

Pages