खर्डी येथे आढळून आलेल्या सैनिकाच्या मृतदेहाची ओळख पटली... जम्मु काश्मिरमध्ये सेवा बजावत होते; पण...

Pandharpur Live Online- 
तालुक्यातील खर्डी येथील रेल्वे रूळाच्या गेटवर आढळून आलेला ‘तो’ मृतदेह हा एका सैनिकाचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  अनुसे सुखदेव भागाप्पा (वय28) असे मृत जवानाचे नाव आहे. ते जम्मू काश्मीरमधे सेवा बजावत होते. सध्या ते  बेळगाव येथे प्रशिक्षणासाठी होते; परंतु प्रशिक्षणादरम्यान ते सोमवारपासून बेपत्ता झाल्याची माहिती हाती येत आहे. एका भारतीय सैनिकाच्या अशा रितीने आढळलेल्या मृतदेहाच्या बातमीमुळे पंढरपूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहीती अशी की , सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील बेंकळी याठिकाणचे अनुसे सुखदेव भागाप्पा हे रहिवासी आहेत. 2013 मधे अनुसे हे भारतीय लष्करी सेवेत रूजू झाले होते. सध्या ते जम्मू आणि काश्मिर याठिकाणी सेवा बजावत होते. गत रविवारी ते बेळगाव याठिकाणी लष्करी प्रक्षिशणासाठी ट्रेंनिंग सेंटरमधे दाखल झाले होते. मात्र त्यानंतर एक दिवसच बेळगावात राहील्यानंतर सोमवारपासून ते बेळगावातून बेपत्ता होते. याबाबत बेळगावात अनुसे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे. यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी याठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.

खर्डी याठिकाणी रेल्वेरूळावर त्यांचा मृतदेह आढळला आहे. यानंतर तालुका पोलिसांनी त्यांच्याबाबतचा तपास सुरू केला. यावेळी अनुसे यांच्या खिशामधे काही कागदपत्रे आढळून आली. याशिवाय कोल्हापूर-सोलापूरची रेल्वे तिकीटे देखिल यावेळी आढळून आली. यामधे अनुसे यांनी नक्की आत्महत्या केली. की अन्य काही ? याबाबतचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अनुसे यांच्या निधनाची पोलिसांनी त्यांच्या कुंटुबियांनी माहीती दिली आहे. याबाबत पुढील तपास तालुका पोलिस निरिक्षक किरण अवचर करीत आहेत.