विद्यार्थिनींना घ्यायला लावलेल्या 'त्या' शपथेमुळे संतापल्या पंकजाताई - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 14 February 2020

विद्यार्थिनींना घ्यायला लावलेल्या 'त्या' शपथेमुळे संतापल्या पंकजाताई

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना 'प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही' अशी शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. या प्रकारामुळे राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला..शपथ मुलींना का आणि ती ही प्रेम न करण्याची…,असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही..वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आज जागतिक प्रेम दिन आहे. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, विद्यार्थिंनींना प्रेम न करण्याची शपथ घ्यायला लावून शाळेने आपला संकुचित विचार दाखवला आहे.

No comments:

Post a Comment

Pages