वन कर्मचारी व अधिकारी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 19 February 2020

वन कर्मचारी व अधिकारी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम

Pandharpur Live-
वन कर्मचारी व अधिकारी यांच्या करीता प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. उपवनसंरक्षक श्री. प्रवीण बडगे यांच्या पुढाकाराने एक नवीन पाऊल उचलले गेले.  आपल्या रॅपीड रेस्न्यू युनीट परिवारामध्ये नवीन सदस्यांचे आगमन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन रॅपीड रेस्न्यू युनीट ची पुणे वनवृत्तांतर्गत सोलापूर वन विभागामध्ये स्थापना करण्यात आली. 

याअंतर्गत प्रथम चरण म्हणजे सर्व  रॅपीड रेस्न्यू युनीट मधील निवडक व इच्छूक सदस्यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण दिनांक 15 व 16 रोजी पंढरपूर येथे घेण्यात आले. ह्यामध्ये सर्वांनी जोमाने व पूर्ण एकाग्रतेने प्रशिक्षण घेतले. दुसर्‍या टप्प्यात या पैकी फक्त 20 ते 25 पुढे जातील व त्यांना पुढील ट्रेनींग देण्यात येईल.

add