बाप रे! केवळ 15 सेकंदात होते "करोना" ची लागण!! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

बाप रे! केवळ 15 सेकंदात होते "करोना" ची लागण!!


Pandharpur Live Online-
महिलेला भेटताच अवघ्या १५ सेकंदात 'करोना'ची लागण
बीजिंग: चीनमध्ये करोना व्हायरसचं प्रचंड थैमान माजल्याने लोकांनी घराबाहेर पडणंही सोडून दिलं आहे. एक व्यक्ती बाजारामध्ये केवळ 15 सेकंदासाठी एका महिलेच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या व्यक्तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


करोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण कोणत्या स्टेपवर आहे, याची माहिती मिळावी म्हणून डॉक्टरांनी करोनाच्या लागणनुसार रुग्णांना नंबर दिले आहेत. या रुग्णाला 5 नंबर दिला आहे. दक्षिण पूर्व चीनमधील शुआंगडोंगफेंग बाजारात तो एका महिलेच्या बाजूला अवघा 15 सेकंद उभा होता. ही महिला दोन नंबरची रुग्ण होती. तिच्या संपर्कात येताच त्यालाही करोनाची लागण झाली. त्याच्यावर उपचार सुरू असून आठवडाभरात तो कुठे कुठे गेला होता आणि कुणाच्या संपर्कात आला होता, याची माहिती काढण्यात येत आहे. हा व्यक्ती निंगबो येथील राहणारा असल्याचं जिआंगबेईच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं.


चीनच्या वुहान शहरातून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. या आजाराने चीनमध्ये आतापर्यंत 564 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 28 हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे. करोनाचं थैमान वाढतच असल्याने रुग्णालयात रुग्णांसाठीच्या खाटांची आणि आरोग्य चिकित्सेसाठी लागणार्‍या सुविधांची कमतरता भासत आहे. एकट्या वुहानमध्येच 8182 रुग्णांना 28 रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वुहानच्या सर्व रुग्णालयात केवळ 8254 खाटाच आहेत. करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हुबेई प्रांत आणि त्याच्या आसपासच्या शहरात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages