पंढरपूर- सातारा रस्त्यावरील पूल कोसळला - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 10 February 2020

पंढरपूर- सातारा रस्त्यावरील पूल कोसळला


सुपली (ता. पंढरपूर) गावाजवळील पंढरपूर- सातारा रस्त्यावरील उजनी कालव्यावर असलेला पूल कोसळला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
उजनी कालव्यावरील हा पूल असून मागील काही दिवसांपूर्वी पुलाला भगदाड पडले होते.

पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुपली (ता. पंढरपूर) गावाजवळील उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल रविवारी (ता. 9) रात्री साडेदहा वाजणेच्या सुमारास अचानक कोसळला. स्थानिक रहिवाशी सचिन माळी या तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

अचानक पूल कोसळल्याने सोलापूर, उस्माबाद, सातारा, महाबळेश्‍वर, लातूर, परभणी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक बंद झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. येथील उजनी उजव्या कालव्यावर 1992ला पूल बांधण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून येथील पूल धोकादायक बनला होता. सध्या उजनी कालव्याला पाणी सोडले आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच पुलाची एक भिंत खचली होती.

सध्या कालव्याचे पाणी सुरु आहे. रात्रीची वेळ असल्याने वाहतूक अतिशय तुरळक सुरू होती. वाहने नसतानाच हा पूल कोसळला असून यामुळे मोठा धोका टळला आहे. कालव्याच्या दोन्हीही बाजूला कॅनलच्या मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे इथे वाहने सावकाश चालतात. यात कोणतीही जीवित किंवा वित्तीय नुकसान झालेले नाही.

पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांचेतर्फे नागरिकांना माहितीस्तव आवाहन
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे कडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की पंढरपुर ते सातारा जाणारे महामार्गावर सुपली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गावाजवळ असणारा उजनी कॅनॉल वरील पूल  दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास कॅनॉल मध्ये खाली कोसळला असून या पुलावरील सर्व वाहतूक संपूर्णपणे थांबविण्यात आलेली आहे.
     पूल कोसळण्याच्या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची जीवीत व वित्तहानी झालेली नाही सदर घटनेच्या अनुषंगाने संबंधित सर्व शासकीय विभागांना कळविण्यात आले असून पंढरपूर सातारा जाणाऱ्या मार्गावर सर्व वाहतूक वेळापूर साळमुख मार्गे वळविण्यात आली आहे सदर घटनेमुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण झालेली नाही अपघाताचे ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे कडून लावण्यात आला असून सुरक्षा संदर्भातील काळजी घेण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांना सातारा कडे जायचे आहे त्यांनी वेळापूर साळमुख मार्गे पर्यायी वाहन मार्गाचा वापर करावा.
अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.भस्मे यांनी दिली आहे. 

add