संतांची शिकवण अंगीकारणे महत्त्वाचे -रवि वसंत सोनार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

संतांची शिकवण अंगीकारणे महत्त्वाचे -रवि वसंत सोनार


Pandharpur Live-
पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ सर्वच संत महात्म्यांनी वेळोवेळी समाजाला योग्य दिशा देऊन चांगल्या मार्गाकडे वळवले आहे. आजही मानवाने संतांची शिकवण अंगीकारल्यास मानवी जीवनाचा उद्धार निश्चितपणे होईल. ” असे मत '  युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्र ' चे संस्थापक अध्यक्ष रवि वसंत सोनार - दहिवाळ यांनी व्यक्त केले. ते येथील राणा प्रताप ग्रुप व युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्र  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार म्हणाले “  संतांनी   सांगितलेला  पारमार्थिक विचार हा सर्व मानवजातीला मार्गदर्शक ठरणारा आहे. संतचरित्र आणि संतांचे विचार अभ्यासल्यामुळे जीवनाचे महत्त्व कळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संतांची शिकवण अंगीकारली पाहिजे.”

           श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रम प्रसंगी राणा प्रताप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक प्रताप चव्हाण, अभिनव अकॅडमीचे संचालक मंदार केसकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन लादे, सचिन कदम, उद्योजक कृष्णाजी सुरशेटवार, बाबासाहेब शिंगण, वृक्षमित्र आनंद नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages