पंढरपूर तालुक्यातील तिसंगीच्या ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ राधिकाताई पवार यांची यशोगाथा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 11 March 2020

पंढरपूर तालुक्यातील तिसंगीच्या ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ राधिकाताई पवार यांची यशोगाथा      
 ''मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी'.... या उक्तीप्रमाणे अनेक महिलांनी विविध क्षेत्रात नेत्रदिपक यश संपादन करुन आपल्या माहेरचे व सासरचे नाव उज्जवल केलेले आढळते. यापैकीच एक नाव म्हणजे राधिका बाबुराव पवार हे होय. राधिकाताई या पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 10 वर्षापासुन त्या आपली सेवा कर्तव्यदक्षपणे पार पाडत आहेत. नुकताच त्यांना सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

           ढोणे भिलारे वस्तीच्या अंगणवाडीचे मूल्यमापन केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने सोलापूर जिल्ह्याचा ‘आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार’ राधिका पवार यांना बहाल केला. स्वत:चा संसार सांभाळत राधिकाताईंनी शाळेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्काराचे बीज पेरुन शिक्षणाचे बाळकडु देण्याचं सद्कार्य त्या करत आहेत. 

          विद्याथ्यार्ंच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारी ज्योत म्हणजे शिक्षक होय. दि. 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनादिवशीच हा पुरस्काराचा सन्मान मिळवून राधिकताईंनी पंढरपूर तालुक्याचं व तिसंगीचं नांव झळकवलं. शिक्षणासोबत मुलांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचं कार्य त्या करत आहेत. त्यांनी स्वखर्चाने  शाळेच्या भिंती रंगबेरंगी रंगात रंगवल्या, शाळेच्या परिसरात हिरवागार बगीचा तयार करून खर्‍या अर्थाने  शाळा म्हणजे मंदिर,  संस्काराचे भांडार व ज्ञान देणारी देवी असल्याचं दाखवून दिलं. आज येथे असंख्य मुलं फुलपाखरासारखी बागडत आनंदाने शिक्षण घेत आहेत. राधिकाताईंच्या या कार्याला पंढरपूर लाईव्हकडून सलाम!

add