जग जिंकण्याची क्षमता असणाऱ्या महिलांनी आपल्या शक्तीला विकसीत करावे- सौ.सोनिया बाबर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 11 March 2020

जग जिंकण्याची क्षमता असणाऱ्या महिलांनी आपल्या शक्तीला विकसीत करावे- सौ.सोनिया बाबर


 आटपाडी ( प्रतिनिधी ) :-  जग जिंकण्याची क्षमता असणाऱ्या माता भगिनी युवतींनी आपल्यातील आत्मीक शक्तीला विकसित करावे असे उदगार विटा येथील जीवन प्रबोधिनी महाविदयालयाच्या प्राचार्या , आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा सौ . सोनिया बाबर यांनी आटपाडी येथे बोलताना काढले . 
           उन्नती महिला विकास फौडेशन आटपाडीच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभात त्या बोलत होत्या .
               इंजिनियर सौ . अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उन्नती फौडेशनने महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना व्यासपीठ आणि सुप्त कला गुणांना वाव देण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे स्पष्ट करून सौ . सोनिया बाबर यांनी आपली संस्कृती जपत स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवला पाहिजे , आपल्या माता पित्याच्या त्यागाला कधीच विसर पडू न देता सर्वच क्षेत्रात आपले नैपूण्य दाखवले पाहीजे .आटपाडी तालुका प्रज्ञावंत , गुणवत , कर्तृत्व संपन्न जिगरबाज धाडसी स्वाभीमानी व्यक्तींचा तालुका आहे यात माणदेशी सर्व गुण संपन्नतेच्या माता भगिनी नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत असे गौरवोदगार काढले . यावेळी सौ सोनिया बाबर यांनी सर्व  विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
             उन्नती महिला विकास फाउंडेशनने एक मार्च 2020 रोजी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये धावणे व सायकल स्पर्धा तसेच लेझीम सोलो डान्स वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या 8 मार्च महिला दिनानिमित्त या स्पर्धांचे बक्षीस वितरण होते तसेच आटपाडी बस स्टँड ते पोलीस स्टेशन मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. 
 या कार्यक्रमास सोनिया बाबर, इंजिनीयर अनिता पाटील खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ.भूमिका बेरगळ आटपाडी पोलीस निरीक्षक बी. ए . कांबळे साहेब, डॉ.सुप्रिया कदम,  डॉ.सौ. साधना पवार मॅडम, डॉ. शिंदे मॅडम डॉ. सारिका देवडकर, सचिव वंदना जाधव,मंजुश्री पाटील, रेखा पाटील , संगीता जाधव , मंजुश्री पाटील ,छाया कदम आदि उपस्थित होत्या
                  लेझीम स्पर्धेत 
सम्राज्ञी ग्रुप आटपाडी- प्रथम क्रमांक 
सावित्री ग्रुप आटपाडी-  दुतीय    रणरागिनी ग्रुप शेटफळे- तृतीय क्रमांक
                वेशभूषा स्पर्धेत कविता घाडगे - प्रथम 
सुमन मईंड - दुतीय
सुचिता गायकवाड -तृतीय क्रमांक मिळवला
                 सोलो डान्स स्पर्धेत
 संध्या देवकुळे- प्रथम
 डॉ सुप्रिया कदम -द्वितीय
 पूजा सपाटे -तृतीय क्रमांक मिळवला
               तसेच सायकल स्पर्धेत 
डॉ सारिका देवडकर- प्रथम  सीमा कदम -द्वितीय 
 मयुरी जरे -तृतीय क्रमांक मिळवला
              धावणे स्पर्धेत       संध्या गायकवाड - प्रथम 
डॉ सुप्रिया कदम- द्वितीय
 डॉ सारिका देवडकर- तृतीय क्रमांक मिळवला.
            सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. महिला दिनाच्या निमित्ताने उन्नती फौंडेशन , आटपाडी तालुक्यातील ५  मुलीना दत्तक घेणार असल्याचे व त्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे  फौंडेशनच्या अध्यक्षा सौ . अनिता पाटील यांनी सांगितले,सूत्रसंचालन ज्येष्ट शिक्षिका योगिता शिंदे यांनी केले.

Ad