डॉ. बाबासाहेब आंबेडकर 129 वी जयंतीची निमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळाची कार्यकारणी जाहीर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 11 March 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 129 वी जयंतीची निमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळाची कार्यकारणी जाहीर

  
पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील अमरभिम सांस्कृतिक, कला, क्रिडा व शैक्षणिक मंडळ संचलित व्यायाम शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची बैठक मंडळाचे संस्थापक सुनिल सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे जेष्ठ सदस्य रवींद्र शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली, यामध्ये अध्यक्ष पदी सुरज पाटील,  सरचिटणीस पदी सुरज साखरे, कार्याध्यक्ष पदी शुभम ठोकळे, खजिनदार पदी भूषण सर्वगोड, लेझिम प्रमुख पदी गणपत सर्वगोड, आकाश भोपळे, कपिल सर्वगोड, उपाध्यक्ष पदी युवराज माने, सोहेल पटेल यांची निवड करण्यात आली.
            मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती महोत्सवानिमित्त चांगले उपक्रम राबविल्याबद्दल माजी अध्यक्ष अमोल पाटील व इतर पदाधिकार्‍यांचा सत्कार मंडळाचे जेष्ठ सदस्य, राजू बनसोडे, चंद्रकांत सर्वगोड,अभिराज उबाळे, कुमार गायकवाड, सुरेश सावंत, बाळासाहेब साखरे, डॉ. प्रशांत सर्वगोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            ह्या बैठकीमध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबीर राबविणे, गरजू लोकांना मदत करणे. असे उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचा निर्धार अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा यांच्या वतीने करण्यात आला.
            यावेळी RPI युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड.किर्तीपाल सर्वगोड, राजू बनसोडे, बाळासाहेब साखरे, सुरेश सावंत, चंद्रकांत सर्वगोड, कुमार गायकवाड,  उमेश सर्वगोड, डॉ. प्रशांत सर्वगोड, मिलिंद माने, विनोद बंगाळे, गणपत सर्वगोड, शाहू सर्वगोड,  ज्ञानोबा ऊर्फ बापू सर्वगोड, पत्रकार अभिराज उबाळे, पत्रकार अपराजित सर्वगोड, नंदू सर्वगोड, पिंटू रणपिसे, राहुल सर्वगोड, सचिन सरवदे सर, रवी सर्वगोड, अविनाश आवचारे, विशाल एेदाळे, गोविंद सोनवले, सुनिल अगावणे, परसू पवार, समीर तांबोळी, अजय नाईकनवरे, कपिल बनसोडे, सीताराम वाघमारे, आकाश बनसोडे अदिसह पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.    

add