माजी मंत्री सुभाष देशमुख यांची भंडीशेगाव येथील व्यायामशाळेस भेट - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 18 March 2020

माजी मंत्री सुभाष देशमुख यांची भंडीशेगाव येथील व्यायामशाळेस भेटखर्डी अमोल कुलकर्णी
  भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील व्यायामशाळेस माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाराम विभूते हे उपस्थित होते.        गावातील सर्व तरुणांनी राजकारण बाजूला ठेऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा तसेच महिलांनी घरकामाबरोबर छोटे छोटे उद्योग सुरू करून गावात त्याचे विक्री केंद्र सुरू करून गावाचा व सर्वांचा विकास साधावा असे मत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले .

भंडीशेगाव येथे नियोजित व्यायामशाळेचे काम सुरू असून ही व्यायामशाळा  पुढील महिन्यात हनुमान जयंतीला सुरू कार्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्या सोबत एक सुसज्ज अभ्यासिका देखील सुरू करण्यात येणार आहे,तसेच गावात 42 एकर वरती माजी सहकार मंत्री  सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रीम गार्डन चा वनराई प्रजेक्ट सुरू असून सोलापूर सोशल फाउंडेशन व आलिशा कंडरे यांच्या माध्यमातून ड्रीम कृषी पर्यटन केंद्र चे काम सुरू आहे ही कामे पाहण्यासाठी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट दिली असल्याचे डॉ.श्रीधर येलमार यांनी सांगितले .     

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या पल्लवी येलमार , साधना गिड्डे, सुवर्णा चौगुले,मीना येलमार,संगीता येलमार,वर्षा उलभागात, वर्षा येलमार , उर्मिला येलमार,शकीला शेख ,उज्ज्वला शिंदे ,मनीषा येलमार ,सुनीता गिड्डे, माजी पोलीस अधिकारी आबासाहेब दैठणकार , माजी सरपंच राजाभाऊ माने ,उपसरपंच संतोष ननवरे , सतीश रणखांबे ,डॉ.अनिल कंडरे,सचिन येलमार ,महेंद्र येलपले,मारुती गिड्डे,गणेश पाटील,अनिल विभूते ,योगेश गिड्डे, मोहन अनपट, आदी उपस्थित होते .

सूत्रसंचालन सतीश रणखांबे यांनी केले तर आभार साधना गिड्डे यांनी मानले .

add