पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी... मोटार सायकल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश.... चोरलेल्या 4 लाख 33 हजारांच्या दुचाकी गाड्या हस्तगत! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 4 March 2020

पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी... मोटार सायकल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश.... चोरलेल्या 4 लाख 33 हजारांच्या दुचाकी गाड्या हस्तगत!

Pandharpur Live-
पंढरपूर तालुका पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून सदर टोळीकडून चोरलेल्या 15 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

यासंदर्भात  तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुका पोलिस ठाणेत दि. 30 जानेवारी 2020 रोजी पंढरपूर तालुक्वयातील कासेगाव येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनवली (ता.पंढरपूर) येथील आरोपी महेश पांडुरंग चव्हाण (वय20) यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व साथीदार बंडु उर्फ जयदीप प्रकाश गायकवाड रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर याच्यासह हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीस अटक करुन पोलिस कोठडी मंजुर करवुन घेतली होती. याकडे अधिक तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार बंडु गायकवाड यांनी अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, शिरोळ (जि.कोल्हापूर), शाहूपुरी (जि.कोल्हापूर), सांगली, मिरज, जयसिंगपूर तसेच पंढरपूर तालुका परिसरातून चोरलेल्या एकुण 15 मोटारसायकली असा 4 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार बंडु उर्फ जयदीप गायकवाड हा अद्याप फरारी असुन त्याचा शोध  चालु आहे. सदर आरोपी मिळुन आल्यास त्याच्याकडून आणखी साथीदारांची नावे व निष्पन्न होण्याची व आणखी मोटारसायकली मिळण्याची शक्यता पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी व्यक्त केली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांचे  मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  किरण  अवचर, सहा. पोलिस निरीक्षक आदीनाथ खरात, सपोनि ओलेकर, पोसई वसमळे, पोहेकॉ  श्रीमंत पवार, पोहेकॉ  शिवाजी पाटील, सुधीर शिंदे, भिमराव गोळे, उमाजी चव्हाण, पोना बापुसाहेब मोरे, पोना गजानन माळी, श्रीराम ताटे, पोकॉ देवेंद्र सुर्यवंशी, पोकॉ सचिन तांबिले, पोकॉ अभिजित ठाणेकर, चापोना बाबुराव भोसले, अनिल वाघमारे, या पथकाने केली असुन सदर गुन्ह्याचा अधिख थपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिवाथ खरात हे करत आहेत. m

add