शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांचा आणखी एक मोठा निर्णय... सावकारांचं कर्जही होणार माफ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांचा आणखी एक मोठा निर्णय... सावकारांचं कर्जही होणार माफ

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
महाविकासआघाडीने एकापाठोपाठ एक कृतिशील योजनांचा धडाका लावला असून २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर सावकारी कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय आज उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

         बांधावर जाणारा मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या उद्धव ठाकरे यांनी सावकारी कर्जमाफीसाठी ६५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा आज केली.  या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून याचा लाभ आता किती शेतकऱ्यांना मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

            महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. आता विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ करण्याचा सरकारचा मानस आहे. जिल्ह्यातील ३८ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार असून सावकरांकडून घेतलेले तब्बल ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीने ट्विट करत दिली आहे.

           शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर सरकारकडून त्या संबंधित सावकारांना रक्कम अदा केली जाईल, अशी माहिती पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रात नमूद केली आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहितीदेखील या ट्विटद्वारे देण्यात आली आहे.
             महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकर्‍यांची दुसरी यादी नुकतीच सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकर्‍यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

add