खुश खबर... कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नाहीसे करणा-या रसायनाचा शोध- शास्त्रज्ञांचा दावा


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाग्रस्त पृष्ठभागाचे एका मिनिटात निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनाचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध "इल्सव्हेअर जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्‍शन' या शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे.
         युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन ग्रीफस्वाल्ड, हायजीन अँड एन्व्हायर्मेंटल मेडिसिन इन्स्टिट्यूटमधील डॉ. जी. कम्प, डॉ. डी. टॉड आणि डॉ. एस. पिफंडर यांनी हे संशोधन केले आहे.
          सामान्य तापमानाला एक ते नऊ दिवसांनी संसर्गग्रस्त पृष्ठभागावरून कोरोना विषाणू नष्ट होतो. इथेनॉल, हायड्रोजन पॅरेक्‍सॉइड आणि सोडियम हायपोक्‍लोराईटपासून बनविलेले हे रसायन अवघ्या एका मिनिटात पृष्ठभाग निर्जंतूक करते.
         सिव्हर ऍक्‍युट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) कोरोना आणि मिडल ईस्ट रेस्पायटरी सिंड्रोम (मार्स) प्रकारातील २२ प्रकरणांचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला. प्लॅस्टिक, ग्लास आणि धातूवरील विषाणूचे निर्जंतुकीकरण यामुळे सहज शक्‍य झाले आहे. वैद्यकीय उपचारासाठी या रसायनांचा वापर करण्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी आहे.
        सामान्य तापमानाला (३० अंश सेल्सिअस) दोन ते नऊ दिवस कोरोनाचा विषाणू वातावरणात जिवंत राहतो.
            योग्य वातावरण मिळाल्यास २८ दिवसांपर्यंत विषाणू जिवंत राहू शकतो.
३० अंस सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला विषाणू जास्त काळ तग धरू शकत नाही.
संसर्गित पृष्ठभागातून पाच सेकंदांत विषाणूचे संसर्ग होतो.
एका तासात साधारणपणे २३ वेळा मानवी त्वचेचा संपर्क हाताशी येतो.
त्यातून पाच सेकंदात ३१.६ टक्के विषाणू संसर्गित होतात