पंढरीत भाविक व मंदिर कर्मचाऱ्यांना मास्क व सँनीटायझर वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 12 March 2020

पंढरीत भाविक व मंदिर कर्मचाऱ्यांना मास्क व सँनीटायझर वाटपकेमिस्ट संघटनेचे प्रशांत खलीपे यांच्या वतीने मोफत वाटप
सध्या सगळीकडे कोरोना विषाणूंच्या भीतीने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे; अशातच  एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष प्रशांत खलीपे यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून मंदिर समिती कर्मचारी व भाविकांना मोफत मास्क व  सँनीटायझर चे मोफत वाटप केले. 
यावेळी सोलापूर येथील औषध प्रशासनअधिकारी नामदेव भालेराव ,मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगीरे ,प्रशांत खलीपे आदी  उपस्थित होते.


अन्न व औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी केमीस्ट संघटनेचे पदाधिकारी व सभासद व मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

add