मॉरिशसला गेलेल्या पंढरपूरच्या ‘त्या’ व्यक्तीची कोरोना तपासणी होणार... पंढरपूरकर अफवांवर विश्‍वास ठेवु नका - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 12 March 2020

मॉरिशसला गेलेल्या पंढरपूरच्या ‘त्या’ व्यक्तीची कोरोना तपासणी होणार... पंढरपूरकर अफवांवर विश्‍वास ठेवु नका

Pandharpur Live- पंढरीतील एक व्यक्ती मॉरिशसला टुरवर गेलेली होती. विदेशातून परत येताना त्याच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. 
              खबरदारी म्हणुन सदर व्यक्तीची पंढरीत येताच प्राथमिक तपासणी केली जाईल व यानंतर आवश्यकता वाटली तर त्यास पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
                 ही व्यक्ती सध्या आंध्रप्रदेशवरून पंढरपूरला येत आहे. त्याला कोरोना वायरस लागण झाली आहे का? याची तपासणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन तयारीत असल्याचे समजते. परंतु पंढरपूरकरांनी घाबरु नये, कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पंढरपूर लाईव्हकडून करण्यात येत आहे.
S

add