कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरीत उपाययोजना... बाहेर गावातुन पंढरपूर शहरात येणा-या नागरीकांच्या नोंदी नगरपरिषदेमध्ये करा- आ.प्रशांतराव परिचारक यांचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 26 March 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरीत उपाययोजना... बाहेर गावातुन पंढरपूर शहरात येणा-या नागरीकांच्या नोंदी नगरपरिषदेमध्ये करा- आ.प्रशांतराव परिचारक यांचे आवाहन


शहरातील किराणा दुकान व औषध दुकाने, दुध डेअरी येथे गर्दी होवु नये म्हणुन प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहण्याच्या दृष्टीने मा.उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या सुचनेनुसार अशा प्रकारे चुन्याने चौकोन आखण्यात आले आहेत. 

संपुर्ण जगात व देशात करोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर शहरतील नागरीकांमध्ये या रोगा विषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या समवेत सर्व नगरसेवकांची बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी कोरोना व्हायरस संबंधी नगरपरिषदेने विविध उपाययोजना कराव्यात अशा सुचना देवुन नागरीकांनी त्यांच्या घरामध्ये देश-विदेश व परराज्यातुन, परजिह्यातुन आलेल्या नागरीकांच्या नोंदी पंढरपूर नगरपरिषदेकडे ऑनलाईन नोंदवाव्यात किंवा नगरपरिषदेचे कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील त्यांच्याकडे न लपविता त्यांच्या नोंदी द्याव्यात व शहरातील नागरीकांनी विनाकारण बाहेर पडु नये तसेच प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी येणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांबरोबर समक्ष हजर राहुन प्रभागातील नागरीकांना कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करावी असे आवाहन केले होते.

  त्यानुसार आज नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदशर्नाखाली 86 कर्मचा-यांच्या टिमद्वारे स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी 17 प्रभागामध्ये घरोघरी जावुन परगावावरुन आलेल्या नागरीकांच्या सर्व्हेचे काम केले तसेच कोरोना व्हायरसची जनजागृतीही करण्यात आली. शहरामध्ये अग्निशामक पाण्याच्या टँकरद्वारे व 4 ब्लोअर मशीन व 15 हातपंपाद्वारे निर्जंतुकिकरण करण्याची मोहिम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे. शहरातील किरणा दुकान व औषध दुकाने येथे गर्दी होवु नये म्हणुन प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहण्याच्या दृष्टीने मा.उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या सुचनेनुसार चुन्याने चौकोन आखण्यात आले आहेत. तसेच भाजी मंडईमध्ये विशेषत: भादुले हौदाजवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही भाजी व फळ विक्रेत्याला एका ठिकाणी बसु न देता हात गाडी द्वारे प्रत्येक गल्लोगल्ली जावुन भाजी व फळ प्रत्येक नागरीकांच्या दारात मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्रे देण्यात आली आहेत. नगरसेवक संजय निंबाळकर, इरफान उर्फ सनी मुजावर व नवनाथ रानगट यांनी त्यांच्या शेतातील स्वत:च्या फवारणी ब्लोअर आणुन आपल्या प्रभागातील फवारणी स्वत: उभारुन करुन घेतली आहे. तसेच शहरामध्ये बेघर (भिकारी) मोठ्या प्रमाणात असुन सुमारे 80 बेघर यांना विशेष मोहिम आखुन नगरपरिषदेच्या निवारा केंद्र येथे त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. शहरातील सर्व्हेचे काम पुर्ण होताच ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला असेल अशा व्यक्तींवर विशेष पथकाद्वारे 14 दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. जनजागृतीच्या दृष्टीने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठे डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत.

 तसेच कोरोना व्हायरस एखादा संशयित (सदृश) अथवा बाधीत व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर उपचार होण्याच्या दृष्टाने उपजिल्हा रुग्णालय यांचेशी संपर्क साधावा. तसेच सदर कोरोना व्हायरसचे मोठ्या शहरांमध्ये प्रमाण वाढल्याने नोकरी निमित्त बाहेर गावी गेलेले किंवा पंढरपूर शहरातील नागरीकांचे नातेवाईक राज्यातुन व परराज्यातुन तसेच परदेशातुन आलेल्या काही व्यक्ती ही पंढरपूर शहरामध्ये दाखल झालेले आहेत असे निदर्शनास आले आहे. तरी अशा व्यक्ती ज्या घर मालकांकडे राहण्यासाठी आल्या असतील त्यांनी त्वरीत नगरपरिषदेशी संपर्क साधुन योग्य ती माहिती नगरपरिषदेचा टोल फ्री क्रमांक 18002331923 यावर कळवावी. तसेच नगरपरिषदेच्यावतीने व्हॉट्सअपद्वारे माहिती भरणेच्या फॉर्मची लिंक शेअर करण्यात आलेली आहे. त्यावर देखील नागरीकांना माहिती भरावी असे अवाहन नगराध्यक्ष साधनाताई भोसले, मु्ख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सभापती, सर्व नगरसेवक - नगरसेविका  यांनी केली आहे. या कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नगरअभियंता नेताजी पवार, नगररचनाकार अतुल केंद्रे, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.    

add