कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीतर्फे निर्जंतुकीकरणासाठी गोपाळपूरात केली फवारणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 26 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीतर्फे निर्जंतुकीकरणासाठी गोपाळपूरात केली फवारणी  पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहून विविध विधायक कार्ये करत असते. संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व गोपाळपूरचे प्रशासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी यांच्या सहकार्याने विश्वात थैमान घातलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरस पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वेरीतर्फे गोपाळपूरमध्ये संपूर्ण वर्दळीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. दरम्यान ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असा संदेश देखील यावेळी देण्यात येत होता.यावेळी स्वेरीचे व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

add