कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसंगीत जंतूनाशक फवारणी... गाव 100% बंद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 27 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसंगीत जंतूनाशक फवारणी... गाव 100% बंद


तिसंगी (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे कोरोना या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून,  जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

उपसरपंच गोरख भाऊ पाटील, ग्रामसेवक बालाजी येलेवाड ,पोलीस पाटील स्वप्नील लोखंडे, ग्रामपंचायत क्लार्क मधुकर धनवले यांच्या प्रयत्नातुन तिसंगी गावातील सर्व परिसरात टीसीएल  पावडर ची फवारणी करण्यात आली.  आण्‍णासो मेटकरी व चेअरमन आनंदराव आंबुले या दोन्ही शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरची मदत घेऊन, पूर्ण तिसंगीतील रस्ते, गल्लीबोळ या पावडरच्या साह्याने फवारणी करून घेतली.

जनजागृती करून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला .यावेळी पंढरपूर लाईव्ह चे ग्रामीण प्रतिनिधी अशोक पवार सर व संजय कारंडे सर यांनी जनजागृतीसाठी मदत केली विशेष सहकार्य म्हणून स्वप्नील लोखंडे तसेच ए.एस.आय आटपाडकर, पोलीस पवार, मुलानी यांनी चांगली साथ दिली .पोलिसांच्या सहकार्यातून गाव शंभर टक्के बंद आहे.

add