आता 'कोरोना व्हायरस' वर बनतोय चित्रपट...'कोरोना प्यार है" - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 16 March 2020

आता 'कोरोना व्हायरस' वर बनतोय चित्रपट...'कोरोना प्यार है"


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना व एकीकडे सरकारे याची चिंता करीत असतानाच आता दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीने त्यावर चित्रपट बनवण्याची तयारी केली आहे.
बाजीराव मस्तानी, तनु वेड्‌स मनु रिटर्न्स, बदलापूर, बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या इरोज इंटरनेशनल या कंपनीने 'कोरोना प्यार है' नावाच्या चित्रपटाची नोंदणी केली आहे. कोविड-19 वर नोंदणीकृत हा पहिला चित्रपट ठरला आहे.

सन 2000 मध्ये हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा कहो ना प्यार है हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने बॉक्‍स ऑफिसवर यश मिळवीत ब्लॉकबस्टरमध्ये नाव नोंदविले होते. आता 'कोरोना प्यार है' हेच नाव असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या वृत्ताला खुद्द निर्माता क्रिशिका लुल्ला यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, सध्या या चित्रपटाची कथा तयार करण्याचे काम सुरू आहे. जेव्हा सर्व स्थिती सामान्य होईल, तेव्हा आम्ही हा प्रकल्प सुरू करणार आहे. या चित्रपटात कोण-कोणते कलाकार असतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

'कोरोना प्यार है' या व्यतिरिक्त 'वुहान वेपन करोना', 'करोना द ब्लॅक डे', 'करोना द इमर्जन्सी', 'डेडली करोना' यांसारख्या चित्रपटांच्या नावांची नोंदणी झाली आहे. करोना विषाणूच्या भीतीने सध्या जरी बॉक्स ऑफिस बंद असलं तरी भविष्यात त्यावरच आधारित चित्रपट निर्मितीसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनकडे ( अर्थात इम्पा) करोनावर आधारित चित्रपटांच्या नावांची यादीच आली आहे.

add