पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज... आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा- मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 24 March 2020

पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज... आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा- मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना


 मुंबई दि. २४:  पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत कराव्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबईपुणेपिंपरी चिंचवडयासारख्या शहरात ताकदिने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहानगरपालिकांचे अधिकारीपोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  उद्योग मंत्री सुभाष देसाईसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमुख्यसचिव अजोय मेहता,  पोलीस महासंचालक सुबोध जैस्वालमुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग,   बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशीयांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले कीविषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटसमास्कव्हेंटिलेटररुग्णालयाची सुसज्जता  याकडे लक्ष द्यावेमोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्याप्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घ्यावे. गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावीत्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
 भ्रमात राहू नका
मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नयेआपण  कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोतत्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे. आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे या आपल्या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
कामाची विभागणी करा
मंत्रालयमुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावर कामाची विभागणी  केली जावीयंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात
औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी.
राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी  असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार
फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असताना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत, अशांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  अन्ननागरी पुरवठासार्वजनिक आरोग्यवैद्यकिय शिक्षणपोलीसअन्न औषध प्रशासन नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांची रक्कम तातडीने देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  खाजगी आस्थापनांमध्येकारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन त्यांनी केले.


संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू
लोकहितासाठी कठोर निर्णय
-   मुख्यमंत्री
            मुंबई दि. २४: जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. आज मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह कार्यक्रमातून हे जाहीर केले. विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्ह्यांच्या सीमाही सील
            मुख्यमंत्री म्हणाले की देशांतर्गत विमान वाहतूक थांबवण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे.  आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राच्या सीमा आपण सील केल्या आहेतच. आता जिल्ह्याच्या सीमाही आपण सील करत आहोत. जिथे विषाणुचा अजुन प्रादुर्भाव झालेला नाही तिथे विषाणु पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश  आहे.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
            ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वंयशिस्तीने वागण्याची आहे असे  मुख्यमंत्री म्हणाले कीही बंधने  काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तुऔषधेऔषधे निर्माण करणारे कारखानेदुधबेकरी कृषी उद्योगांशी संबंधित दुकानेपाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरुच राहणार आहेत. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूक ही सुरु राहणार आहे.
गर्दी नाही म्हणजे नाहीच
            गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की,  अत्यावश्यक सेवेमध्येच  खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील.  टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त  अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल. संकट आहे पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य व्यवस्थेचा आढावा
            आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविकाआशाहोमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन यांची मदत घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमांना धन्यवाद
            घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमे ही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतूक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सुत्राद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.  

होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी
            परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस  समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावेबाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहेपुढचे काही दिवस महत्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खुप काळजी घेण्याची गरज आहेआतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेऊन आपण सर्व मिळून त्यावर मात  असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जनजागृती वाढावी- बाळासाहेब थोरात
जनजागृती वाढल्यास या विषाणुविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावीया विषाणूचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.
ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे
राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी लोक मर्यादित स्वरूपात एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निदर्शनास आणले. 
जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित राहावा- सुभाष देसाई
सगळ्या प्रकारचे इंधनकच्चामालबेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यातई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआरअंतर्गत शासनास मिळत असलेल्या सहकार्याची यावेळी माहिती दिली.

प्रभावी प्रशासनाची गरज- मुख्यसचिव
प्रभावी पोलिसिंग आणि प्रभावी प्रशासनाची गरज मुख्यसचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले कीमंत्रालयात पॉलिसी कंट्रोल रुमची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हास्तरावर कामाचे आणि जबाबदारीचे वाटप व्हावे. राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
        कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  प्रत्येक जिल्ह्याने वाहतूक नियोजन (ट्रान्सपोर्ट प्लॅन) तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे  येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे.  ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सूचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असे निर्देश त्यांनी दिले.

add