महाराष्ट्रात संचारबंदी लागु : प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद; अत्यावश्यक सुविधा सुरू - मुख्यमंत्री ठाकरे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 23 March 2020

महाराष्ट्रात संचारबंदी लागु : प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद; अत्यावश्यक सुविधा सुरू - मुख्यमंत्री ठाकरे


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आजपासुन महाराष्ट्रात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.
जमावबंदीच्या आदेशानांतर आज मुख्यामंत्र्यांनी अधिकची खबरदारी घेत संचारबंदीही लागू केली.

आज दि. 23 मार्च रोजी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ वरुन ८९ वर गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. यात आवश्यक कारणासाठी टॅक्सी आणि रिक्षाही सुरु ठेवाण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही संचारबंदी मौजमजेसाठी नाही तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी असल्याचेही सांगितले.

आज राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ८९ वर पोहचल्यानंतर आपण आता एका नाजूक वळणावर पोहचल्याचे सांगितले. त्यामुळे नाईलाजास्तव संचाबंदी सारख्या कडक उपाययोजना करत असल्याचे ते म्हणाले. जरी संचारबंदी आसली तरी लोकांच्या दैनंदिन आत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी त्याच्याशी निगडीत सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

धान्य, भाजीपाला, दूध आणि बँक यांच्याबरोबरच आवश्यक असेल तर टॅक्सी आणि रिक्षांनाही परवानगी दिली आहे. पण, टॅक्सी आणि रिक्षा यांच्यातील प्रवाशांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. टॅक्सीत २ तर रिक्षात फक्त १ प्रवासी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर आत्यावश्यक कारणासाठीच गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील जनजीवर विस्कळीत होऊ नये म्हणून शेतीशी निगडीच दुकाने आणि पशुखाद्य दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


add