धक्कादायक... इस्लामपुरातील 'त्या' कोरोनाबाधितांचा ३३७ लोकांशी संपर्क! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आता 159 - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 28 March 2020

धक्कादायक... इस्लामपुरातील 'त्या' कोरोनाबाधितांचा ३३७ लोकांशी संपर्क! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आता 159


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  इस्लामपूर मधील त्या २३ कोरोनाबाधीत रुग्णांपैकी काहीजण आत्तापर्यंत तब्बल ३३७ लोकांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाच्या सर्व्हेतून पुढे आली आहे. अजूनही काही लोक संपर्कात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या लोकांमध्ये सध्यातरी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांना होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे.

सौदी अरेबियातून आलेल्या एकाच कुटुंबातील या चौघांमुळे त्यांच्या कुटुंबातील इतर १९ जणांना आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अजूनही ३९ जणांचे तपासणी अहवाल अद्याप यायचे आहेत. यातील काहींचे अहवाल आज येणार आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रशासनाने आत्तापर्यंत केलेल्या सर्व्हेत हे लोक शहरातील विविध भागातील ३३७ लोकांच्या संपर्कात आले आहेत. यामध्ये एकत्रीत जेवण केलेले पाहुणे, मित्र परिवार, दुकानात आलेले ग्राहक- पिग्मी एजंट, नमाज पठणासाठी एकत्रित जमलेले लोक आणि हस्तांदोलन केलेल्यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून संपर्कात आलेल्या लोकांचा सर्व्हे करण्याचे काम अजुनही सुरू आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आता 159 
राज्यभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशाातच महाराष्ट्रात 6 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 159 वर गेली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता 159 झाली आहे.
6 new positive cases found in the state today - 5 in Mumbai and 1 in Nagpur. The total number of positive cases in the state rises to 159: Maharashtra Health Ministry
View image on Twitter
113 people are talking about this
राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घरातच थांबा, कोरोनाला रोखा असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

add