धक्कादायक... मृत्यू झालेल्या रूग्णाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह... अंत्ययात्रेत अनेकांचा सहभाग... बुलढाण्यात भीतीचे वातावरण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 29 March 2020

धक्कादायक... मृत्यू झालेल्या रूग्णाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह... अंत्ययात्रेत अनेकांचा सहभाग... बुलढाण्यात भीतीचे वातावरण


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईनबुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णाचा काल शनिवारी तासाभरात मृत्यू झाला होता.  या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

सदर रुग्णाच्या स्वॉबचे नमुने ते नागपुरला तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी त्याचे रिपोर्ट्स आले असून दगावलेला रूग्ण हा कोराना बाधीत होता अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद्र पंडीत यानी दिली आहे. त्यामुळे या रूग्णाच्या संपर्कात किती लोक आले याचा तपास केला जात असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे समजते. 

मृत व्यक्ती ही बुलढाणा शहरातीलच असून ती वयोवृद्ध नव्हती. बुलढाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याचा निमोनिया अधिकच वाढत गेला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. 

सदर मयत रूग्णाच्या अंत्ययात्रेला अनेकजण सहभागी असल्याचे समजते. दरम्यान या घटनेमुळे बुलढाणा शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

add