रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही: निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 24 March 2020

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही: निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा


मुंबईदि. 23 :- कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास राज्यात संचारबंदी लागू केली जाईलअसा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
            घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्यामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. शासनाने आतापर्यंत संयमाने घेतलेपरंतु बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईलअसा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोनाची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेलपरिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जावू शकेलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
            शासनाने घेतलेल्या निर्णयांचेनिर्बंधांचे पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे. राज्याचा आरोग्य विभागपोलीस विभागस्थानिक स्वराज संस्थांचेतसेच प्रशासनातील अधिकारीकर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नयेतसे केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करुअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

add