प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे पंढरपूरकरांना महत्वपूर्ण आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 23 March 2020

प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे पंढरपूरकरांना महत्वपूर्ण आवाहन


पंढरपूर,दि.23: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी बाहेरील देशाहून तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून  पंढरपूरात येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांनी  आपली  नोंद करावी असे आवाहन प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
            परदेशाहून तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून पंढपूरात परतलेल्या नागरीकांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी  खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपली नांवे संबधीत यंत्रणेकडे नोंदवावी. शहरी भागात येणाऱ्या नागरीकांनी आपली नोंद नगरपालिकेकडे करावी अथवा टोल फ्री क्रमांक 18002331923 येथे संपर्क साधावा. तसेच ग्रामीण भागातील नागरीकांनी आपली नोंद संबधीत गावचे पोलीस पाटील  यांच्याकडे करावी अथवा तालुका नियंत्रण कक्ष  (दुरध्वनी-02186-223556) येथे संपर्क असे आवाहनही असे आवाहन प्रांतधिकारी ढोले यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची दक्षतापूर्वक तपासणी करावी. त्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना ही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या आहेत.

add