नागरिकांनो घराबाहेर पडू नका... स्वत:ची काळजी घ्या!- प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 20 March 2020

नागरिकांनो घराबाहेर पडू नका... स्वत:ची काळजी घ्या!- प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन

           पंढरपूर -20-  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरीकांनी भिती बाळगू नये. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सूचना पाळून स्वत:ची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हाधिकारी  मिलींद शंभरकर यांनी  दिलेल्या आदेशान्वये 20 मार्च ते 31 मार्च 2020 या कालावधीत जीवनाश्यक वस्तू,औषधे, फळे, भाजीपाला वगळून  इतर गर्दी होणारे दुकाने बंद करण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.

            कारोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने  आरोग्य विभागाला वैद्यकीय सुरक्षा साहित्याचा (सेफ्टी किट) पुरवठा करणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग साथ रोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून, त्या अनुषंगाने तालुक्यातील जीवनाश्यक वस्तू,औषधे, फळे, भाजीपाला वगळून  शाळा, अंगणवाड्या, मठ, मंगल कार्यालय, पान टपऱ्या, परमिट रुम बिअर बार, चित्रपटगृहे, आठवडी बाजार यांच्यासह गर्दी होणारे दुकाने बंद करण्याचे सक्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती  प्रांतधिकारी ढोले यांनी दिली. नागरीकांनी  सर्व उपाययोजनांसाठी सहकार्य करावे. स्वत:मध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी  आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे, आवाहनही प्रांतधिकारी  ढोले यांनी केले.

            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी  तसेच एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 34 तसेच पोलीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम  37 (3) अन्वये जिल्हाधिकारी  मिलींद शंभरकर यांनी  दिलेल्या आदेशान्वये 20 मार्च ते 31 मार्च 2020 या कालावधीत जीवनाश्यक वस्तू,औषधे, फळे, भाजीपाला वगळून  इतर गर्दी होणारे ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत त्या अनुषगांने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी शहरातील व ग्रामीण भागातील मठांची व  गर्दी होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करुन संबधितांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गर्दी होणार यांची काळजी घ्यावी व स्वच्छता पाळावी आदी सूचना दिल्या.    

add