डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात लावला चोख पोलीस बंदोबस्त.... कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यात अनेकांवर कारवाई!

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागु आहे. या कालावधीत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. याच आदेशानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात उपविभागीय पोलीस  अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी  पंढरपूर शहर पोलीस ठाणे व तालुक्यातील  अन्य पोलीस ठाणे हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज शहर व तालुक्यात कायद्याचे उल्लंघन करणार्‍या कांहीजणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

  पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत इसबावी येथे सुमनकिर्ती मोटा रसायकल शोरुममध्ये अंमलबजावणी न केलेने भारतीय दंड संहिता कलम 188प्रमाणे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील महत्वाचे चौक सावरकर चौक, लहुजी वस्ताद चौक,  शिवाजी चौक येथे प्रत्येक 2 वाहतुक पोलीस कर्मचारी व 3 कमांडोंची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर  शहर हद्दीत कलम 110/117 प्रमाणे 8 ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत. 

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत शेगाव दुमाला येथे कायद्याचे उल्लंघण करुन विनाकारण रेंगाळणार्‍या एकावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठअणेच्या हद्दीतील अहिल्यादेवी चौक येथे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी तसेच अनवली चौक येथे 1 पोलीस अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. 

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे उपरी येथे शिवक्रांती जनरल स्टोअर्स चे दुकान चालु ठेवुन विक्री करत असताना आढळल्याने 188 कलमान्वये आपत्ती व्यवस्थापन कलम 2005 चे कलम 51 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीतील वाखरी चौक येथे 2 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 करकंब पोलीस ठाणे हद्दीत मौजे करकंब येथे साई टेलर हे सुरु ठेवून कामकाज करीत असताना भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  करकंब पोलीस ठाणे हद्दीत मौजे जळोली चौक येथे 1 पोलीस अधिकारी 2 पोलीस कर्मचारी तसेच भोसे पाटी येथे 2 पोलीस कर्मचारी यांची नाकाबंदी नियुक्ती करण्यात आल्या आहेत. करकंब पोलीस ठाणे हद्दीत कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  हे नाकाबंदी कॉम्बिग ऑपरेशन  चालूच राहणार आहे.