कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे च्या सहयोगातुन सांगोला रोड परिसरात जंतूनाशक फवारणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 29 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे च्या सहयोगातुन सांगोला रोड परिसरात जंतूनाशक फवारणी

Pandharpur Live - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमोल घोडके यांच्याकडून पंढरीतील सांगोला रोड  एम .एस .ई. बी .कोयना वसाहत , व चर्च मंदिर या परिसरामध्ये फवारणी करून घेण्यात आली.
   
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पंढरी नगरीमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मनसे कडू वरील भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.   मनसैनिकांनी  प्रभागांमधील सर्व नागरिकांना घराच्या बाहेर येऊ नय,  स्वच्छता राखा आणि घाणीचे साम्राज्य पसरू देऊ नका, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. असे आवाहन करण्यात आले. 

उपस्थित प्रभागांमधील नागरिक अनिल राऊत, दत्ता चंदनशिवे, सुरज इंगळे, अंकुश जाधव, विकास खटकाळे,प्रवीण शेळके, राहुल ढांगे, रोहित वाकोडे, प्रकाश खट इत्यादी उपस्थित होते.

add