साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला... 45 वर्षीय महिला कोविड-19 बाधित - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 24 March 2020

साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला... 45 वर्षीय महिला कोविड-19 बाधित


सातारा दि. 23 :  काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या  45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा  अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते.   या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली. 
           या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला  सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.         
             तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

add