महत्त्वाची बातमी- अत्यावश्यक सेवा सोडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद... जिल्हाधिका-यांचे आदेश! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 20 March 2020

महत्त्वाची बातमी- अत्यावश्यक सेवा सोडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद... जिल्हाधिका-यांचे आदेश!


पंढरपूर लाईव्ह- आज दिनांक 20 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजलेपासुन दिनांक 31 मार्च 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळुन सर्वच दुकाने, मॉल्स बंद चे आदेश सोलापूर चे जिल्हाध्यक्ष मिलींद शंभरकर यांनी दिले आहेत. 

कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन  प्रशासनाकडून प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात हा बंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.  

वरील कालावधीत जिल्ह्यातील सर्व मॉल्स,  आठवडे बाजार,  जनावरांचे बाजार, सोने चांदीचे दुकाने,  कापड दुकाने, अॅटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीक- इलेक्ट्रॉनिक दुकाने,  प्लायवुड, टिंबर ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून हा आदेश देण्यात आला आहे.  जीवनावश्यक सेवा किराणा दुकाने, औषधे, फळे, भाजीपाला ही दुकाने वगळता इतर दुकाने वरील कालावधीत बंद ठेवणे अनिवार्य आहे. या आदेशाचा भंग करणारांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

add