धक्कादायक- कोरोनाचा पुण्यात शिरकाव... २०० खाटांचे रूग्णालयासह डॉक्टरांचे पथक सज्ज - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 10 March 2020

धक्कादायक- कोरोनाचा पुण्यात शिरकाव... २०० खाटांचे रूग्णालयासह डॉक्टरांचे पथक सज्ज

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात आढळला आहे. दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या दोनही जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच पुण्यातील नायडू रूग्णालयात यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नायडू रूग्णालयात विलिगीकरण कक्षात यांना ठेवण्यात आलं आहे. हे एकूण 40 जण दुबईला गेले होते, 1 तारखेला हे पुण्यात परतले आहेत, या 40 जणांचा शोध घेतला जात असून, हे कुणा कुणाच्या संपर्कात आले आणि यांची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे.
कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण सोमवारी पुण्यात आढळून आले आहेत. दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रात आणि ते सुद्धा पुण्यात शिरकाव केला आहे. दुबईहून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या दोन रुग्णाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने काही तासातच 200 खाटांचे तात्पुरते रुग्णालय सुरु केले आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

पुढील काही तासात ही रुग्णालये सुरु केली जाणार आहेत.
दुबईहून आलेल्या पती-पत्नीला कोरोना झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने स्पष्ट केले. एका खासगी टूर कंपनीसोबत ते जागतिक पर्यटनाला गेले होते.पुण्यात आल्यानंतर त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. मात्र कालपासून त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले.

त्याचप्रमाणे यानंतर ते ज्या विमानाने आले त्या ठिकाणच्या 40 जणांची तपासणी सुरु आहे. तसेच हे दोघे ज्या ठिकाणी जात होते, ज्यांना भेटले त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्या दाम्पत्याचा ज्या ठिकाणी संपर्क आला आहे, त्यांच्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील 14 दिवस या सर्वाना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली

add