Corona- पुण्यात लागू झाला आपत्ती व्यवस्थापन कायदा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Wednesday, 11 March 2020

Corona- पुण्यात लागू झाला आपत्ती व्यवस्थापन कायदा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाल्याने अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुण पूर्ण वेळ तैनात ठेवण्यात येईल. याशिवाय संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष, मदत केंद्राची स्थापना, जास्त भावाने मास्क वा औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय लोकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुणेकरांना कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा.

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातऊन आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत.

Ad