दारू पिल्यास 'कोरोना' पासून बचाव होतो ? जाणुन घ्या सत्य... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 12 March 2020

दारू पिल्यास 'कोरोना' पासून बचाव होतो ? जाणुन घ्या सत्य...

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सोशल मीडियावरती कोरोना व्हायरस संदर्भात अनेक अफवा पसरवणारे संदेश हे पसरत आहेत त्यातीलच एक म्हणजे दारूचं सेवन केल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही असं या संदेश मध्ये लिहलेले आहे. हा संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेनं अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
       दारूचं सेवन केल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही हि एक अफवा आहे. कोरोना झाल्यानंतर तुम्ही दारू पिला तरी तो व्हायरस मारला जाऊ शकत नाही, ती एक काल्पनिक कथा आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
          कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या अंगावर मद्य शिंपडणं, मद्यपान करणं किंवा मद्य देणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संस्थेनं केलं आहे.
          जागतिक आरोग्य संस्थेनं असे म्हटले की ,क्लोरीन आणि किटाणूनाशक म्हणून मद्याचा वापर करत असले तरीही ते अशावेळी शरीरासाठी घातक आहेत. त्यामुळे अशी द्रव्य घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर WHO ने नागरिकांना असे आवाहन केले आहे कि,कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ साबणाने हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावून फिरा आणि स्वच्छता राखा.

add