राज्यात कोरोनाचे एकुण 26 रूग्ण ; शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 15 March 2020

राज्यात कोरोनाचे एकुण 26 रूग्ण ; शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहितीमुंबईदि. 14 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिकानगरपालिकानगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळामहाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळामहाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यानराज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले कीकोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहेनाट्यगृहेतरणतलावव्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलिस प्रशासन यांना राज्यशासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.
राज्यातील शहरी भागातील सर्व शाळामहाविद्यालयेअंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतीलअसे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.
राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीयव्यावसायीकयात्राधार्मिकक्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दरम्यानराज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले असून पुणे येथे 10मुंबई -5रायगड -1कल्याण- 1अहमदनगर- 1नागपूर- 4ठाणे -1यवतमाळ 2कल्याण 1 रुग्ण आढळून आले आहेत.

add