Corona- शासकीय आदेश नाही पाळला तर कठोर कारवाई करू... मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 16 March 2020

Corona- शासकीय आदेश नाही पाळला तर कठोर कारवाई करू... मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
मुंबई : ‘कोरोना संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे गर्दी टाळणे महत्वाचे आहे. आपण आवश्यक ती दक्षता घेत आहोत. उपचार करण्यापेक्षा काळजी घेणे चांगले. काही गोष्टी आपण स्वतःहून पाळायला पाहिजे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कोणतेही सिनेमागृह चालू असेल तर कारवाई केली जाईल. आम्ही लिखित आदेश दिले नसले तरी काल जे काही बोललो ते आमचे आदेश आहेत. आदेश न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आम्ही शाळा, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व मॉल बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
दरम्यान, ‘गर्दी टाळण्यासाठी मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 ‘करोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे आणि राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

add