कोरोनाची दहशत.. किरकोळ व्यावसायिक अन् हातावरचे पोट असलेल्यांना आधार कोण देणार? - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 18 March 2020

कोरोनाची दहशत.. किरकोळ व्यावसायिक अन् हातावरचे पोट असलेल्यांना आधार कोण देणार?


पंढरपूर लाईव्ह-
कोरोना व्हायरसमुळे सबंध जगात हाहाकार माजलेला असतानाच आता महाराष्ट्रातील अनेक देवस्थांनांचे दर्शन बंद केल्यामुळे देवस्थानासमोर हार, नारळ, पुजेचे साहित्य विक्री करून आपला चरितारार्थ चालविणा-या  असंख्य किरकोळ विक्रेत्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

पंढरपूर मध्ये ही अनेक किरकोळ विक्रेत्यांचे यामुळे बेहाल झाले आहेत.

मंदिर परिसरात हार, फुलं व पुजेचे साहित्य विक्री करणारे, देवाचा गंध लावणारे व्यावसायिक यांच्या दैनंदिन रोजीरोटी वर याचा विपरीत परिणाम होणार आहे.

पंढरपूर सारखेच महाराष्ट्रात अनेक देवस्थानं आहेत जिथं असे असंख्य सर्वसामान्य विक्रेते रोजी रोटी कमावतात. अशा हातावर पोट असलेल्या गोरगरीब विक्रेत्यांचे आर्थिक साधन बंद झालेले असताना यांच्या  उघड्या पडलेल्या  संसाराला शासन काही हातभार लावणार का? हे प्रश्नचिन्ह कायम आहे.

यासह बिगारी कामगार आणि मोलमजुरी करून हातातोंडाची लढाई लढणा-या  असंख्य गोरगरिबांना आधार कुणाचा? हा प्रश्न ही निरूत्तरीतच आहे. 

add