Corona- जागतिक आरोग्य संघटनेकडून 'कोरोना' महामारी घोषीत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Thursday, 12 March 2020

Corona- जागतिक आरोग्य संघटनेकडून 'कोरोना' महामारी घोषीत


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणूने जगभरात एकच थैमान केला आहे. दरम्यान करोना विषाणूची गंभीर दखल आता जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जवळपास 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने करोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. तर, भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संक्रमित देश आणि मृत्यूची संख्या  चीन-3169  इटली -827 इराण- 354 दक्षिण कोरिया-66 स्पेन-55 फ्रान्स-48 अमेरिका-38 जपान-15 स्वित्झर्लंड-4 जर्मनी-3
          चीनच्या वुहान प्रातांतून जगभर पसरलेल्या करोना विषाणूने आत्तापर्यंत तीन हजार 200 च्या जवळपास लोकांचा बळी घेतला आहे. तर, जगातील जवळपास 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.
           या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ या जागतिक संघटनेने करोना विषाणूला महामारी म्हणून घोषित केले आहे.
              भारतात आतापर्यंत 62 जणांना करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत तरी मिळणार नसल्याचे सांगितले आहे.
              भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालले आहे. आतापर्यंत देशात करोनाचे 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 16 परदेशी पर्यटाकांचा समावेश आहे. केरळमध्ये सर्वाधिक 17 करोनाग्रस्त असून त्याखालोखाल हरियाणा 14, उत्तरप्रदेश 9 आणि महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. तर दिल्ली 4 आणि राजस्थानात 3 रुग्ण आढळून आले आहे. या सर्वांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
संपूर्ण जगभर करोनाची दहशत आहे. राज्यात करोनाचे 10 रुग्ण पॉझिटिव्ह असून काळजीचे कारण नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच प्रशासनावर ताण येत असल्याने अधिवेशन शनिवारपर्यंत आटोपणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले.

Ad