CORONA- महाराष्ट्रात एकही संशयित रूग्ण नाही...भारतात रूग्णांची संख्या पाच ; कोरोनाची लक्षणं व बचावण्याचे उपाय


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
कोरोना विषाणूच्या (कोविड - १९) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत. मात्र, आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. सध्या मुंबईत दोघे, पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात निरीक्षणाखाली १३७ जणांना ठेवले होते. त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर १३० जणांना घरी सोडण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

भारतातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्या देशांमध्ये COVID-19 (कोरोना व्हायरस) या व्हायरसचा परिणाम झाला आहे, तिथून हे रुग्ण प्रवास करुन भारतात पोहोचले आहेत.

त्याचबरोबर तिसरा संशयीत रुग्ण राजस्थानमध्ये आढळून आल्याचे तिथल्या अधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राजस्थानमध्ये एका इटलीच्या पर्यटकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली होती त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.

दिल्लीत आढळून आलेल्या रुग्णावर सध्या सफदरजंग रुग्णालयात विशेष स्वतंत्र वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. तो इटलीला जाऊन आला आहे. इटलीमध्ये या व्हायरचा मोठा प्रादुर्भाव झाला असून आजवर तिथं १६९४ रुग्ण आढळून आले आहेत तर त्यांपैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती व्हिएन्नामार्गे एअर इंडियाच्या विमानाने २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत दाखल झाली आहे.
तर हैदराबादमधील कोरोनाचा रुग्ण हा गेल्या आठवड्यात दुबईहून भारतात परतला. दुबईत आजवर कोरोनाची लागण झाल्याची १९ प्रकरणं समोर आली आहेत. ही व्यक्ती २० फेब्रुवारीला दुबईहून हैदराबादला परतली. त्यानंतर २२ फेब्रुवारीला ती बेंगळूरूला गेली तिथं त्या व्यक्तीनं पाच दिवस काम केलं. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पुन्हा हैदराबादला पोहोचली.

काय आहेत कोरोनाची लक्षण -
कोरोना व्हायरस 2019 ची लक्षण सुरुवातीला सामान्य होते. सुरुवातीला श्वास घेण्यास अडचण येते, खोकला आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कोरोना व्हायरस संलग्न जे व्हायरस आहेत ते नुकसानकारक नाही. जर कोणी रुग्ण सामान्य कोरोना सारख्या वाटणाऱ्या व्हायरसने बाधित होतो तर तो तीन दिवस किंवा आठवड्यात ठीक होतो परंतु कोरोना व्हायरससंबंधित सहा व्हायरस आहेत, जे जीवघेणे ठरु शकतात. आताचा व्हायरस नोवल कोरोना व्हायरस 2019 या व्हायरसपैकी 7 वा अत्यंत घातक व्हायरस आहे. याच व्हायरसमुळे सार्स (सिवियर एक्यूट रेसपिरेटरी सिंड्रोम) आणि मर्स (मिडल ईस्ट रेसपिरेटरी सिंड्रोम) सारखे आजार पसरतात. आता हा नवा आजार पसरत आहे.

काय आहे सुरुवातीची लक्षणं -
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरुवात तापाने होते, त्यानंतर कोरडा खोकला, श्वास घेण्यात अडचण येऊ लागते. नोवल कोरोना व्हायरस फुफुसाला नुकसान पोहोचवतो. त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणखी नाजूक होत जाते.

संक्रमण टाळण्याचे आणि वाचण्याचे 10 उपाय -
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) ने कोरोना व्हायरसचा प्रभाव असलेल्या लोकांना सूचना दिल्या आहेत, त्यानुसार काही काळजी घेण्यास सांगितली आहे.

1. दिवसातून अनेकदा साबणाने हात धुवा.
2. आपल्या हाताने डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
3. तुमचे आणि कुटूंबाचे आरोग्य व्यवस्थित राहतील यांची काळजी घ्या आणि तेच सेवन करा.
4. खोकताना आणि शिंकताना तोंड व्यवस्थित झाका.
5. कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास पाळीव जनावरांच्या संपर्कात येणं टाळा असे ही सांगितले जात आहे.
6. खोकला, ताप आणि सर्दीचे लक्षण असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.
7. श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णाच्या जवळ जाणे टाळा.
8. कच्चे किंवा अर्ध शिजलेले मांस खाणे टाळा.
9. नियमित स्वच्छता करा.
10. जर ताप किंवा खोकला असेल तर प्रवास टाळा.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय करावे -
आरोग्य कर्मचारी स्वत:च संक्रमित होऊ नये यासाठी खबरदारी बाळगा. गाऊन, मास्क, हातमोजे यांच्या वापराशिवाय रुग्णालयात बाधित रुग्णांच्या वावरण्यावर देखील बंधन आणण्याचा सल्ला दिला गेला आहे.

Post a Comment

0 Comments