नाशिकमध्ये खळबळ... भरदिवसा तरूणावर गोळीबार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

नाशिकमध्ये खळबळ... भरदिवसा तरूणावर गोळीबार


Pandharpur Live Online- 
नाशिकमधील शांतीनगर भागात दोघा संशयिताने एका तरुणावर भर दिवसा गोळीबार करण्याची घटना घडली आहे. या घटनेत किरण भडांगे हा तरुण जखमी झाला आहे. ही घटना म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबादा शिवारातील शांतीनगर येथे सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

भडांगे याच्या हाताला गोळी लागली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भडांगे हा सोमवारी सकाळी बसस्टँडजवळ असलेल्या लाँड्रीजवळ उभा होता. यावेळी संशयित लखन पवार व त्याचा एक साथीदार फड हे दोघे तेथे आले. त्यांनी भडांगे याच्यावर पिस्तुलातून एक गोळी झाडली.

ही गोळी भडांगे याच्या हाताला लागल्याने तो खाली पडला. हे पाहिल्यावर दोघेही पळून गेले. लोकांनी जखमी झालेल्या भडांगे याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

add