धक्कादायक- गोपाळपूरच्या 'स्वेरी' शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्याची फेक व्हिडिओ न्युज व्हायरल... प्रसिद्ध न्युज चॅनलचा लोगो वापरून बनवली फेक न्युज... गुन्हा दाखल! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

धक्कादायक- गोपाळपूरच्या 'स्वेरी' शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्याची फेक व्हिडिओ न्युज व्हायरल... प्रसिद्ध न्युज चॅनलचा लोगो वापरून बनवली फेक न्युज... गुन्हा दाखल!

पालकांनी घाबरू नये... फेक न्युज बनवणाराचा तपास सुरू- पोलीस निरीक्षक किरण अवचर 
पंढरपूर लाईव्ह-
एका नामांकित न्युज चॅनलचा अधिकृत लोगो वापरून 'स्वेरी कॉलेजमध्ये कोरोना चा रुग्ण सापडला' अशी फेक न्युज तयार करून सोशल मीडियावर पसवरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वेरी सारख्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेतील एका विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्याचे या फेक न्युजद्वारे भासवले गेले आहे. 

ही गंभीर बाब स्वेरीचे प्रा. मुकूंद पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी  पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीय. यानुसार  अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अधिनियम भारतीय दंड संहिता 1860 कलम 505(1)(B) व अधिनियम माहिती तंत्रज्ञान 2000 कलम 66(C)(D) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी कोणीही घाबरून जाऊ नये व असल्या फेक न्युज पुढे कुठल्याही ग्रुप वरती पाठवू नये. व पालकांनी घाबरू नये. असे आवाहन तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे किरण आवचर यांनी केले आहे. 
यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

add