टेम्पोचालक, क्‍लीनरचे दुष्कृत्य... प्रवाशी महिलेवर टेम्पोत रात्रभर अत्याचार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 13 March 2020

टेम्पोचालक, क्‍लीनरचे दुष्कृत्य... प्रवाशी महिलेवर टेम्पोत रात्रभर अत्याचार


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- टेम्पोत प्रवासी महिलेवर टेम्पोचालक व क्लिनरने रात्रर  अत्याचार केल्याची संतापजनक घटना आळंदीत घडलीय. प्रवाशी महिलेला  टेम्पोचालक व क्‍लीनरने महिलेला इच्छितस्थळी न सोडता रात्रभर इतरत्र टेम्पो फिरवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चालक व क्‍लीनरवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

याबाबतची माहिती अशी, मंगळवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास पीडित महिला घरगुती कारणास्तव आळंदी येथून घराबाहेर पडली. पेरणेफाटा येथे जायचे असल्याने ती वाहनाची वाट पाहत मरकळफाटा येथे थांबली होती. यादरम्यान येथे टेम्पो आला असता तिने टेम्पोला हात दाखवून थांबवले.

ही महिला टेम्पोत बसली असता आरोपींनी तिला पेरणे फाटा येथे न नेता टेम्पो पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वळवला.

रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत टेम्पो चालक आणि क्‍लीनर यांनी महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केली. तसेच तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला पहाटे चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरात पुणे-बंगळुरू महामार्गावर सोडून दिले.

महिलेने आजुबाजूच्या लोकांच्या मदतीने पोलीस चौकी गाठली. गुन्हा आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

add