विवाहित महिलेशी अनैतिक संबंधातून पिझ्झा डिलीव्हरी बॉयचा खुन... माढा तालुक्यातील धक्कादायक घटना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

विवाहित महिलेशी अनैतिक संबंधातून पिझ्झा डिलीव्हरी बॉयचा खुन... माढा तालुक्यातील धक्कादायक घटना


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पुण्यात पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या एका तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून पिता-पुत्राने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लऊळ गावात घडली आहे. राजाराम घुगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम याचे घरातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपी खंडू गोरे आणि संतोष गोरे या पिता-पुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम घुगे हा मुळचा लऊळ गावचा रहिवाशी आहे. तो पुण्यामध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करत होता.

मात्र लऊळ गावातील गोरे कुटुंबीयातील एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. यापूर्वी गोरे कुटुंबातील पिता-पुत्राने त्याला बजावलं होतं. मात्र, राजारामने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

आरोपींनी सांगितले की, आमच्या घरातील विवाहित महिलेसोबत राजारामचे अनैतिक संबंध होते ते आम्हाला सातत्याने खटकत होते. घटनेच्या दिवशी देखील आमचे याच कारणावरून बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात धारदार लोखंडी कोयता, लाकडी बॅट, बांबूने त्याला जीवे मारल्याची कबुली आरोपींनी दिली. राजारामचा खून केल्यानंतर आरोपी खंडू गोरे आणि संतोष गोरे हे पिता-पूत्र स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

add