मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर वारंवार बलात्कार... पंढरपूर तालुक्यातील निंदणीय घटना

पंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील एका पारधी समाजातील महिलेचा पती जेलमध्ये असताना सदर महिलेस, "तुझ्या मुलांना जीवे मारीन, तु पारधी समाजाची आहेस, तुमच्यात हे सगळे चालते." असे म्हणुन  धमकावत महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याची निंदणीय घटना घडली आहे. पीडीत महिलेने यासंदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. 

पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आरोपी हणुमंत चव्हाण (रा. कौठाळी, ता. पंढरपूर) याने दि. 9-12-2019 रोजी शिरढोण येथे महिलेच्या घरात घुसून पीडीत महिलेच तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या मुलांना जीवे मारीन अशी धमकी दिली. यानंतर दि. 24-1-2020 पर्यंत पीडीतेच्या घरी येऊन तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केला. 

सदर महिलेचा पती जेलमध्ये असताना तुम्ही पारधी समाजातील आहात,  तुमच्या समाजात हे सर्व चालते असे बोलुन आरोपीने अत्याचार केल्याचे व तिच्या पतीला फोनवरून धमकावल्याचेही फिर्यादित म्हटले आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पीडीतेची भेट घेतली असुन आरोपीविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व भादंवि 376, 45, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे हे करीत आहेत.

नुकतीच पंढरीतील एका उपनगरातील महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्याने पंढरपूर परिसर व तालुक्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत.