लग्नास नकार दिल्याने प्रेयसीनं प्रियकराचा गळा चिरून केली हत्या - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 3 March 2020

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीनं प्रियकराचा गळा चिरून केली हत्या

प्रेम प्रकरणावरून पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोयत्यानं गळा चिरून प्रेयसीनं प्रियकराची हत्या केल्याचं समोर येत आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियसीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. नऱ्हे गाव परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकारचं वय २७ वर्ष तर प्रेयसीचं वय २४ वर्ष आहे. प्रियकराची हत्या केल्यानंतर प्रेयसीनं पोलिस स्थानकात जावून घटनेची कबूली दिली. 

add