पुणे- 12 वर्षाच्या चिमुरडीवर 19 वर्षीय तरुणाकडून बलात्कार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 15 March 2020

पुणे- 12 वर्षाच्या चिमुरडीवर 19 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
 पुणे- चिंचवड येथे १२ वर्षाच्या चिमुरडीवर एका १९ वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अदित्य युवराज पवार (वय १९, रा. विद्यानगर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही १२ वर्षाची मुलगी घराच्या पाठीमागे खेळत होती. त्यावेळी अदित्य पवार हा तिथे आला व त्याने या मुलीला तू मला आवडते, असे म्हणून ओळख निर्माण केली. तिला त्याने पळवून नेऊन खदानीमध्ये तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

हा प्रकार दोन तीन वेळा झाला. याची माहिती तिच्या आईला मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अदित्य पवार याला अटक केली आहे.

add